Palghar Crime | आश्रम शाळेतील 12 वर्षाच्या मुलीला कामास बोलावून अधीक्षकाचं विकृत कृत्य, महिला कर्मचाऱ्याने पाहिलं अन्…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्याच्या (Palghar Crime) मोखाडा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन (12 Years Old Minor Girl ) मुलीसोबत शाळेच्या अधीक्षकानं (School Superintendent) घृणास्पद कृत्य केलं. आहे. नराधमा आरोपीने पीडित मुलीला घरकाम करण्यासाठी घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे (Sexually Molest) करत तिच्यावर बलात्कार (Attempt to Rape) करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाहीतर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना जीवे मारेल, अशी धमकी (Threat to Death) दिली. (Palghar Crime)

या प्रकरणी शाळेतील महिला शिक्षिकेनं मोखाडा पोलीस ठाण्यात (Mokhada Police Station) फिर्याद दाखल केल्यानंतर शाळेच्या अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. योगेश अमरसिंग चव्हाण (Yogesh Amarsingh Chavan) असे अटक (Arrest) केलेल्या नराधम आरोपींचं नाव आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Palghar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची (Mahatma Jyotiba Phule Primary and Secondary Ashram School, Ase) विद्यार्थिनी आहे. याठिकाणी ती इयत्ता 7 वीच्या वर्गात निवासी शिक्षण घेते. तर आरोपी योगेश चव्हाण हा निवासी वसतिगृहाचा (Hostel) अधीक्षक आहे. 14 डिसेंबर रोजी आरोपीने घरातील भांडी घासायची असल्याचं सांगून पीडित मुलीला (Victim Girl) घरी बोलावून घेतले. पीडित मुलीनं घरातील भांडी धुतल्यानंतर, फरशी पुसून घेत होती. त्यावेळी आरोपी अधीक्षक या ठिकाणी आला, त्याने पीडितेला पाठीमागून आवळून पकडलं. तुझं कोणावर प्रेम आहे का? म्हणत तो पीडितेच्या अंगाला झटू लागला.

 

 

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीला उचलून आपल्या बेडरुममध्ये घेऊन गेला.
याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीच्या प्रायव्हेट अंगाला स्पर्श करत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.
तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली. दरम्यान,
शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याने संबंधित सर्व प्रकार पाहिला आणि याची माहिती वरिष्ठांना दिली.
यानंतर अधीक्षकांचा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यासह (Pocso Act)
इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास मोखाडा पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Palghar Crime | 12 years old minor girl of ashram school sexually molest by superintendent in palghar, woman worker saw incident and

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips | ‘या’ वेळी केले लिंबूचे सेवन तर चमकदार होईल त्वचा, ब्लड प्रेशरमध्ये लाभदायक

Earn Money | केवळ 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

 

Credit Card | क्रेडिट कार्डचा वापर करताना लक्ष ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

7th Pay Commission | जर आजच केले ‘हे’ काम तर ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होईल वाढ, जाणून घ्या कशी?