Palghar Crime | सेल्फीचा नाद पडला महागात ! मित्रांसोबत ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – Palghar Crime । आपल्या मित्रांसोबत धरण परिसरात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा (friendship day) करण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा धरणात बुडून दुर्देवी मृत्यू (drowned in rodkhad dam) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही घटना रविवारी पालघर (Palghar Crime) जिल्ह्यात घडली आहे. विकास तरे (वय, 17, रा. एडवन जि. पालघर) असं त्या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेवरुन परिसरात हळहळ व्यक्त होते. याप्रकरणी साफाळे पोलीस ठाण्यात (Saphale Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील 16 ते 17 विद्यार्थी ‘फ्रेंडशिप डे’ (friendship day) साजरा करण्यासाठी रोडखड धरण परिसरात गेले होते. रविवारी दुपारी कडक उन्हात तिकडे गेल्यामुळे अनेकांना धरणात पोहण्याची इच्छा झाली. त्यामुळे काही मुलांसह तन्मेष तरे (Tanmesh Tare) देखील धरणात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तन्मेषचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. त्यावेळी त्याचे मित्र यावेळी तिथेच होते. सर्वजण सेल्फी घेण्याच्या गुंगीत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपला एक मित्र धरणाच्या पाण्यात बुडाला आहे. हे देखील त्यांना समजलं देखील नाही. काही वेळानंतर तन्मेष आपल्यासोबत आला होता. परंतु, तो कुठेच दिसत नसल्याचं या मुलांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तन्मेषला सर्व ठिकाणी शोधलं. मात्र, त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर तन्मेष धरणात बुडल्याचा संशय संबंधित मित्रांना आला. त्यामुळे त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने तन्मेषला धरणाच्या पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शोधाशोध केल्यावर स्थानिकांनी तन्मेषचा मृतदेह पाण्यातून काढला गेला.
या घटनेची माहिती समजताच साफाळे पोलिसांनी (Saphale Police Station) घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी घटनेचा पंचनामा करत तन्मेषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
परंतु, ऐन फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मित्राचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title :  Palghar Crime | 17 years old student drowned in rodkhad dam palghar went to celebrate friendship day with friends

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’

Suicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Maharashtra Government | आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार ‘वाइन’; राज्य सरकारचं नवं धोरण लवकरच