पालघर जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – जंगलात (forest) गुरे चरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (girl rape) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पालघर (palghar) जिल्ह्यातील मनोर पोलीस (manor Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगर चोळा गावात घडली आहे. या घटनेतील आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी पीडितेचा नातेवाईक असून त्याच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची वाच्चता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलीने घडलेल्या प्रकारची माहिती कुटुंबीयांना दिली नाही. शुक्रवारी तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी मनोर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी भांदवी कलम 376 आणि 556 पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

You might also like