Palghar Crime News | दुर्दैवी ! जिममध्ये व्यायाम करत असताना 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पालघरमधील घटना

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – Palghar Crime News | आजकाल हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बऱ्याचदा डान्स करताना, जिममध्ये किंवा चालता-बोलता अचानक एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. अशीच एक घटना पालघरमध्ये घडली आहे. यामध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील वसई या ठिकाणी घडली आहे. (Palghar Crime News)
काय आहे नेमके प्रकरण?
हाती आलेल्या माहितीनुसार हि घटना बुधवारी घडली आहे. प्रल्हाद निकम असे हार्ट अटॅकने मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रल्हाद निकम हे जिममध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे व्यायाम करत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमीनीवर पडले. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. (Palghar Crime News)
यानंतर प्रल्हाद निकम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मात्र प्रल्हाद निकम यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर प्रल्हाद निकम यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.
Web Title :- Palghar Crime News | 67-years-old-man-died-in-gym-during-workout-in-palghar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update