Palghar Crime News | पालघरमध्ये पाण्याच्या वादावरून आरोपींकडून महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – Palghar Crime News | पालघर जिल्ह्यातील नवनाथ- कोहराळीपाडा या ठिकाणी महिलांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलांना फक्त शिवीगाळच नाहीतर त्यांना मारहाणदेखील करण्यात आली आहे. पाण्यावरून हि मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. (Palghar Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ- कोहराळीपाडा या ठिकाणी हि घटना घडली आहे. गंजाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्या नातेवाईकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. महिलांना मारहाण करणानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिलांना मारहाण होत असताना गंजाड ग्रुप ग्रामपंचायतचे भाजपचे उपसरपंच हे उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Palghar Crime News)

 

गंजाड येथील नवनाथ- कोहराळपाडा या ठिकाणी दरवेळी उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवत असते, यंदा देखील पाण्याच्या स्रोतांनी काही प्रमाणात तळ गाठला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोतात मोटार टाकून काही कुटुंब पाणी घेतात. मात्र ग्रामपंचायतने मोटारीने पाणी काढण्यास मनाई केली आहे. यामुळे हा वाद झाला आहे. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

 

Web Title :- Palghar Crime News | in palghar women were abused and beaten by man

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

Mango Eating Tips | आंबे खाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा फायद्यांऐवजी होऊ शकते नुकसान

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन