Palghar Crime | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले; शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला सोबत केलं ‘हे’ कृत्य

0
200
Palghar Crime | palghar thane boisar 24 years old boy murder by neighbor after mother refuses to continue extra marital affair
file photo

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघरमधून (Palghar Crime) बेपत्ता झालेल्या पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून (Missing Boy Found body) आल्याने एकच खळबळ उडाली होती. या चिमुकल्याचा बादलीतील पाण्यात बुडवून खून (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध (refuses marital affair) तोडल्याने शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय व्यक्तीने महिलेला धडा शिकवण्यासाठी मुलाचा खून केला. पालघर जिल्ह्यातील (Palghar Crime) बोईसर येथे ही घटना घडली आहे.

 

पाच वर्षाच्या बेपत्ता झालेल्या चिमुकल्याच्या खूनचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर जिल्ह्यातील (Palghar Crime) बोईसर पोलिसांना (Boisar police) यश आले आहे. आरोपी महेंद्र सोमर सिंह (वय-24) या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) बोईसर पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात (Boisar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी जागोजागी पोस्टर तसेच सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आले होते. याच दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विवाहित महिलेने अनैतिक संबंध तोडल्याने आरोपीने तिला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

यामुळे केला खून
आरोपी महेंद्र सोमर सिंह (Mahendra Somar Singh) आणि चिमुकल्याची आई एकमेकांच्या शेजारीच राहत होते.
दरम्यानच्या काळात आरोपीचे विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, अचानक महिलेने विवाहबाह्य संबंध सुरु ठेवण्यास नकार दिला.
त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी तिच्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप आहे.

 

बादलीत बुडवून मारले
चिमुकल्याला पाणी भरलेल्या बादलीत बुडवून आरोपीने त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.
तीन दिवसांपूर्वी बोईसर पोलीस ठाण्यात चिमुकला बेपता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मात्र, बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह बुधवारी (दि.8) आढळून आला होता.

 

Web Title :- Palghar Crime | palghar thane boisar 24 years old boy murder by neighbor after mother refuses to continue extra marital affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार ! ‘YouTube’ पाहून इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं बनावट पेमेंट अ‍ॅपद्वारे 25 सराफांना घातला गंडा

EDLI | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल पूर्ण 7 लाखाचा फायदा, जाणून घ्या – काय आहे पद्धत?