Palghar Crime | पालघरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; पत्रकारितेचा कोर्सही केला होता

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – वाडा तालुक्यातील निंबवली येथे एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्यातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Palghar Crime) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच तरुणीच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ममता परेड (वय 24 ) असे आत्महत्या (Palghar Crime) केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

निंबवली गावी ममता आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण असून, ती पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. ममताने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ममताला वसई – विरार महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरीदेखील लागली होती. ती सोमवारपासून (दि. 12) कामावर रुजू होणार होती. पण, त्यापूर्वी तिने नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Palghar Crime)

 

ममता गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यात होती.
एका उच्चशिक्षित तरुणीने कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी अशाप्रकारे आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Palghar Crime | Suicide of a girl preparing for the competitive exam in Palghar; He also did journalism course

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार