दीड कोटी रुपये किंमतीचे मांडूळ जप्त

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघरजवळील मनोर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मांडूळ जातीचे साप जप्त कले आहेत. या सापांची किंमत दीड कोटी रुपये आहे. अटक केलेल्यांपैकी एकजण राजकिय पक्षाशी संबंधित आहे.

सुनील पांडूरंग धानवा आणि पवन भोया अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोचाडे गावात एका घरात मांडूळ जातीचे साप पाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. तेव्हा घरात गोणीमध्ये साप आढळून आले. त्यानंतर वाईल्ड लाईफ वार्डन यांच्या परवानगीशिवाय मांडूळ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

त्याने निवडणूक लढविली होती

सुनील धानवा हा पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील राहणारा आहे. तो एका राजकिय पक्षाशी संबंधित आहे. त्याने २००९ ला बोईसर विधानसभेची निवडणूक लढविली होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर, येथील पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, जनार्दन मते, शिवाजी पाटील, केंद्रे, मुकेश तटकरे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.