‘त्यानं’ कॉल गर्लसाठी केला फोन, स्वत:च्या बायकोचाच फोटो ‘SEX’ वर्कर म्हणून डेटींग अ‍ॅपवर झाला ‘व्हायरल’

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – एका 30 वर्षीय तरुणाने मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केली. परंतु ही चौकशी त्याला खूपच महागात पडली आहे. या व्यक्तीने फोन केल्यानंतर त्याला थेट 50 हजारांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मात्र त्याच्या पत्नीचा फोटो समोरच्या व्यक्तीने सेक्स वर्करच्या वेशात मॉर्फ करून डेटींग अ‍ॅपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालघरमधील एका तरुणाने 14 डिसेंबर रोजी मसाजसाठी चौकशी केली. यासाठी त्याने एकाला कॉल केला. समोरच्याने मात्र त्याला 50 हजारांची मागणी केली. पीडित तरुणाने नकार दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या पत्नीचा फोटो घेतला आणि पॉर्नस्टार सोबत मॉर्फ केला. यानंतर त्याने ब्लॅकमेल करत हा फोटो डेटींगवर टाकला. तसेच त्याच्या पत्नीचा उल्लेख सेक्स वर्कर असा केला. यानंतर आरोपीने 16 डिसेंबर रोजी पीडित तरुणा अ‍ॅपला याची एक लिंक व्हॉट्सअ‍ॅप केली. यात पत्नीचा फोटो पाहून त्या तरूणाला धक्का बसला. पीडित तरुण व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्ही डेटींग अ‍ॅपची लिकं पाठवणाऱ्याचा नंबर ट्रॅक करत आहोत. आरोपी ऑनलाईन सेक्स चॅट आणि सेक्स वर्कर सर्च करणाऱ्या टोळीत सहभागी आहे असा आम्हाला संशय आहे.” पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पीडित तरुणाने सांगितलं की, “मी मसाजबाबत चौकशी करण्यासाठी 14 डिसेंबर रोजी फोन केला होता. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला 5 मुलींचे फोटो पाठवले. यापैकीची एकीची निवड करून मला चर्चगेटजवळ एका सर्व्हीस सेटंरच्या इथं मुलीला नेण्यासाठी बोलावलं. मी नकार देताच त्याने 50 हजारांची मागणी केली. मी फोन कट केला. एवढे पैसे देणं मला शक्य नव्हतं” असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्याने म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/