Palghar Minor Girl Murder | खळबळजनक ! दुकानात गेलेल्या 8 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याचे विकृत कृत्य, मान कापलेल्या अवस्थेत आढळली चिमुकली

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli gang rape) केल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच पालघर जिल्ह्यातील (Palghar Minor Girl Murder) डहाणू येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू (Palghar Minor Girl Murder) झाला असून डहाणू पोलिसांनी (Dahanu police) एकाला ताब्यात घेतले आहे.

वर्षा घोषे Varsha Ghose (वय-8) असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. तर प्रमोद घोषे Pramod Ghose (वय-35) याला पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी डहाणू पोलीस ठाण्यात (Dahanu police station) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 वर्षाची मुलगी सोमवारी सायंकाळी दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. दरम्यान घराशेजारी राहणाऱ्या (neighbour) प्रमोदने तिच्या मानेवर कोयत्याने सपासप (attack with scythe) वार केले. या हल्ल्यात 8 वर्षाची चिमुकली जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली (Palghar Minor Girl Murder). बराच वेळ झाला तरी मलगी दुकानातून सामान घेऊन परत आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला.

चिमुरडीचा शोध घेत नातेवाईक दुकानाच्या दिशेने गेले. दरम्यान रस्त्यात एका ठिकाणी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.
याबाबत तिच्या नातेवाईकांनी डहाणू पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रमोदला अटक केली.
त्याने मुलीचा खून कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.

Web Title :- Palghar Minor Girl Murder | 8 years old girl attack with scythe and murdered by neighbour in dahanu palghar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Employment Exchange | खुशखबर ! आता ज्येष्ठ नागरिकांना नोकरी देण्यासाठी मोदी सरकार उचलतंय ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती