पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटक केलेल्या 89 जणांना मिळाला जामीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील मॉब लीचिंग प्रकरणात अटक झालेल्या 89 लोकांना ठाण्याच्या एका कोर्टाने जमीन मंजूर केला आहे. कोर्टाने या सर्व लोकांना 15000 रुपये रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या 89 लोकांना या आधारावर जमीन देण्यात आला आहे कि, ते घटनेच्या वेळी केवळ तेथे उपस्थित होते. याआधी या प्रकरणात कोर्टाने डिसेंबर महिन्यात 47 आरोपींना आणि नोव्हेंबरमध्ये 58 लोकांना जमीन मंजूर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात जवळपास 250 लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 16 एप्रिल 2020 रोजी मुले चोरीच्या संशयावरून जमावाने दोन साधूंना मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. ज्यात दोन साधूंची हत्या झाली त्यात कल्पवृक्षगिरी आणि सुशीलगिरी महाराजसोबत त्यांचा ड्रायव्हर निलेशचाही समावेश होता.

याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला माहिती दिली होती कि , त्यांनी एप्रिल महिन्यात पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांची बेदम मारहाण करून हत्या प्रकरणी पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणात दोषी ठरलेल्या पोलिसांविरूद्ध केलेल्या चौकशी आणि कारवाईची माहिती देण्यास सांगितले होते.