पालघर : सहाय्यक पोलिस निरीक्षक अन् उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबीत

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. कसा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

गुरुवारी रात्री डहाणू तालुक्यातील गडचिंचले परिसरात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाला गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करुन त्यांची हत्या केली होती. हा मुद्दा देशभर गाजला या प्रकरणामध्ये पोलिसांनी हे प्रकरण हाताळत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे समजतेय.

पालघरमध्ये नमकं काय घटलं ?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना मागील आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजतेय. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (वय-30) चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय-70 रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (वय-30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.