पालघरमध्ये युतीला मोठा धक्का : नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार विजयी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत युतीला धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या डॉ. उज्वला काळे या विजयी झाल्या आहेत.

पालघर नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणूकीत ६७.५७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेनेमध्ये जोरदार लढत झाली होती. त्यात भाजपने बाजी मारली होती. मात्र, आता युती झाल्यानंतर पालघर लोकसभेची जागा शिवसेनेने आपल्याकडे मागून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पालघर नगर परिषदेत कोणाला कौल मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार युतीला सर्वाधिक १८ जागा मिळण्याची शक्यता असली तरी नगराध्यक्षपदी युतीचा पराभव झाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या डॉ. उज्वला काळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.