तारापूर अणुशक्ती केंद्रजवळ आढळल्या स्फोटकांनी भरलेल्या २ पिकअप व्हॅन

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली त्या ठिकाणाहून २० किलोमीटरच्या अंतरावर संवेदनशील असे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे.

काही दिवसांपूर्वी वसई तालुक्यातील चांदीप येथे जिलेटिन आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त केला होता. ही घटना ताजी असतानाच दोन पिकअप भरुन स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबाद माहार्मावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि आड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी असताना स्फोटकांचा साठा पालघर पोलिसांच्या हाती लागला आहे. अशातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅनसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची कसून चौकशी सुरू आहे.

ह्याहि बातम्या वाचा

आदिवासी विभागात 325 कोटींचा घोटाळा रोखल्याचा धनंजय मुंडेंचा दावा

शेतकऱ्यांना FRP प्रमाणे ऊसबिल मिळण्यासाठी मनसेकडून ढोलबजाव आंदोलन

राज्यात पोलिओमुक्ती विशेष लसीकरणासाठी ८३ हजार बूथ : एकनाथ शिंदे

जम्मू ग्रीनेड हल्ला: दहशतवादी संघटनेनं केला अल्पवयीन मुलाचा वापर