पालघरमधील 2 साधूंच्या मॉब लिंचिंग प्रकरणातील 11 आरोपी ‘कोरोना’ संक्रमित असल्याचं आलं समोर, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची मारहाण करत हत्या केल्या प्रकरणातील 11 आरोपींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील गढ़चिंचले गावात जमावाने मुंबईहून सुरतकडे गाडीने जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाला जोरदार मारहाण करत त्यांची हत्या केली. या प्रकरणात एकूण 156 लोकांना अटक करण्यात आले होते.

पालघर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे, परंतु पालघर कारागृहात काम सुरू असल्याने त्यांना विविध पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, वाड्यातील पोलिस लॉकअपमधील 17 आरोपींची नुकतीच चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 11 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले असून इतर 6 जणांच्या तपासणीच्या निकालाची वाट पहिली जात आहे. ते म्हणाले की, संक्रमितांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जणांना संसर्ग झाल्याचे आढळले.

दरम्यान, एप्रिलमध्ये, महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाला महाराष्ट्रातील पालघरमध्ये रात्री उशिरा जवळपास 200 लोकांनी मॉब लॉचिंग केली. पोलिसांनी घटनेविषयी सांगितले की, तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉबने चोर म्हणून इको व्हॅनमध्ये असलेल्या साधू आणि त्यांच्या चालकास जबरदस्त मारहाण केली. कासा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांनी सांगितले की, व्हॅन नाशिकहून येत होती, तेव्हा दधाडी-खानवेल रस्त्यावरील गधचिंचले गावाजवळ संतप्त जमावाने त्यांना रोखले.