पालघरच्या पोलिस अधिक्षकांची बदली, डी.टी. शिंदे नवे अधीक्षक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंघ (भापोसे) यांची बदली केली असून त्यांच्या जागेवर दत्तात्रय टी. शिंदे यांची नियुक्ती केली आहे. अचानकपणे गौरव सिंघ यांची बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई येथे कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय टी. शिंदे (भापोसे) यांची आता पाघलरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गौरव सिंघ यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश हे स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येतील असं आदेशात नमुद करण्यात आलं आहे.

You might also like