Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – Palghar ZP by-election | काॅग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादीमिळून राज्यात सत्ता स्थापन झालं आहे. त्यातच मागच्या काही दिवसांपासून अनेक मुद्यावरुन भाजप आणि शिवसेना (BJP and Shiv Sena) यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळालं. एकमेकांचे मित्र असणारे पक्ष आता कट्टर दुश्मन पाहायला मिळत आहे. यातच आता पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत (Palghar ZP by-election) मंगळवारी एक वेगळंच चित्र समोर दिसलं आहे. मतदानाच्या आदल्या रात्री भाजपच्या (BJP) गारगाव गटातील उमेदवार करुणा वेखंडे (Karuna Vekhande) आणि त्यांचे पती किशोर वेखंडे (Kishor Vekhande) यांनी चक्क शिवसेनेला (Shiv Sena) जाहीर पाठिंबा दिला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात चक्क भाजप (BJP) उमेदवाराचा शिवसेनेला (Shiv Sena) पाठिंबा मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे मात्र, भाजपची नामुष्की झालीय. वाडा तालुक्यातील गारगाव गटातून भाजप कडून करुणा वेखंडे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व काँग्रेस अशा चार पक्षाची निवडणूक होत असतानाच भाजप उमेदवार करुणा वेखंडे यांचे पती किशोर वेखंडे यांनी सोमवारी रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील (Shiv Sena district chief Prakash Patil) यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा (Palghar ZP By-Election) दिला. यामुळे आता भाजपची नामुष्की झाली आहे.
दरम्यान, किशोर वेखंडे यांनी शिवसेना उमेदवार नीलम पाटील (Shiv Sena candidate Neelam Patil)
यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या पोटनिवडणूकीत भाजप उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे आता भाजप चांगलाच अडचणीत सापडला आहे.
Web Title :- Palghar ZP By-Election | bjp candidates gave support shiv sena after palghar ZP election
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Price Today | सोन्यात 269 रुपये तर चांदीत 630 रुपयांची मोठी वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर