‘अश्लील’ व्हायरल VIDEO मुळं दु:खी झालेल्या प्रिया गुप्तानं दिली आत्महत्येची ‘धमकी’, पोलिसांना म्हणाली… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानी अभिनेत्री आणि डान्सर प्रिया गुप्ता उर्फ सोना बाबूच्या नावाने एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणी सोमवारी प्रिया गुप्ता स्वत: सोशल मीडियावरून समोर आली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचं खंडन करत आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये प्रिया म्हणाली, “मला ओळणाऱ्यांना हे माहिती आहे की, व्हायरल व्हिडीओ माझं नाीहीये, परंतु ते मला बदनाम करत आहेत.”

प्रिया म्हणाली, “आज माझ्यासोबत असं केलं. उद्या तुमच्या घरातील बहिणी-मुलींसोबत असं केलं तर ? प्लीज असं ज्यांनी केलं आहे त्यांना शोधा. असं करणाऱ्यांचा शोध घेतला नाही तर मी आत्महत्या करेल. माझ्या मेहनतीचं जर हे फळ भेटणार असेल तर मला जगायचं नाही. मला इथे रहायचंच नाही.” प्रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आरोपींना शोधण्याचं पोलिसांना आवाहन
प्रिया म्हणाली, “लोक माझ्यावर प्रश्न उपस्थित करत होते की, मी लाईव्ह का येत नाही. घ्या आता मी माझं लाईव्ह स्टेटमेंट दिलं आहे. आता माझी सर्वांना तसेच पोलिसांना विनंती आहे की, लवकरात लवकर त्यांचा शोध घ्या. बाकी मला काही नको. आज माझ्यासोबत असं झालं, उद्या आणखी कोणी मुलगी बदनाम होऊ शकते.”

https://www.instagram.com/p/B4edsjzpbrP/

प्रिया गुप्ताबद्दल थोडक्यात…
प्रिया गुप्ताबद्दल सांगायचं झालं तर, राजस्थानी हास्य, नृत्य आणि अभिनय क्षेत्रात खूपच कमी काळात प्रिया गुप्तानं आपली वेगळी ओळख तयार केली आहे. पीजी फिल्म्स नावानं प्रिया आपल्या टीम सोबत म्युझिक आणि व्हिडीओसाठी काम करते.

https://www.instagram.com/p/B3toqDLJ4gw/

अद्याप पोलिसांत तक्रार नाही
सध्या तरी प्रियाच्या नावानं व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडीओबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली नाही. सोमवारी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये प्रियानं पोलिसांनाही विनंती केली आहे. या पूर्ण प्रकरणाच्या तपासात कोण दोषी ठरतं हे सध्या सांगणं तरी अवघड आहे.

https://www.instagram.com/p/B0BklWKpnm5/

 

Visit : Policenama.com