Palkhi Sohala 2023 | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Palkhi Sohala 2023 | ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) आज पंढरपूरकडे प्रस्थान (Pandharpur Wari) केले. पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे (Bala Bhegade), बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या (Baramati Hi-Tech Textile Park) अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) आदी उपस्थित होते.

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले.
यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे (Nitin MOre),
पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे (Palkhi Sohala Chief Manik More), संतोष मोरे (Santosh More),
विशाल मोरे (Vishal More), संस्थांचे विश्वस्त संजय मोरे (Sanjay More), भानुदास मोरे (Bhanudas More),
अजित मोरे (Ajit More) आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

Web Title :  Palkhi Sohala 2023 | Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023 departs for Pandharpur to the sound of Tal-Mridang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई करते पण ‘या’ प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा