Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळ्यासाठी PMPML ही सज्ज; भाविकांसाठी आजपासून ‘विशेष बस सेवा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Sohala 2023 | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज (Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) पालखी सोहळ्यानिमित्त (Palkhi Sohala 2023) आळंदी आणि देहू (Alandi And Dehu) येथे येणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited म्हणजे पीएमपीने (PMPML) अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे. ही सेवा गुरुवार (दि. 8 जून) रोजी पासून सुरू होत आहे. तर सोमवार (दि.12) जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने (PMP Administration) दिली आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त (Pune Palkhi Ceremony) आळंदी व देहू येथे शहर, उपनगरासह राज्यभरातून शेकडो भाविक उपस्थित होत असतात. त्यामुळे आळंदी साठी स्वारगेट (Swargate), महापालिका भवन (Mahapalika Bhavan), हडपसर (Hadapsar), पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station), निगडी (Nigdi), भोसरी (Bhosari), हिंजवडी (Hinjewadi) आणि चिंचवड स्थानकावरून (Chinchwad Station) सध्या धावणाऱ्या गाड्या व्यतिरिक्त गुरुवार ते सोमवारपर्यंत दररोज एकूण 142 गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय रविवारी (दि. 11 जून) रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आळंदीला जाण्यासाठी विशेष बसची (Special Bus) व्यवस्था करण्यात आली आहे. (Palkhi Sohala 2023)

देहू येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी या ठिकाणावरून संचलनातील आणि जादा गाड्या मिळून तीस गाड्यांद्वारे सुविधा देण्यात येणार आहे. तसेच देहू ते आळंदी या मार्गावर बारा गाड्यांद्वारे सुविधा दिली जाणार आहे. सोमवार (दि. १२ जून) पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार आहे. त्यामुळे पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक, हडपसर, महापालिका भवन या ठिकाणाहून आळंदीला जाण्यासाठी अधिक 18 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. तसेच. नेहमी संचलनात असणाऱ्या गाड्या सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपासून सुरू होणार आहेत.

प्रवाशांच्या गरजेनुसार जादा गाड्यांचे नियोजन –

– पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 113 गाड्या आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात ठेवण्यात येणार आहेत.

– पुण्याहून पालखी प्रस्थानाच्या दिवशी (दि.14 जून) हडपसरमध्ये पालखी दर्शनासाठी दुपारी 12 ते 1 या दरम्यान थांबणार आहे.

– महात्मा गांधी स्थानक येथून पुणे रेल्वे स्थानक, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी येथे जाण्यासाठी बस व्यवस्था करण्यात आली.

– कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर आणि वाघोलीसाठी मगरपट्टा येथून गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Advt.

– पालखी सोहळा सोलापूर आणि सासवड मार्गाने पुढे गेल्यानंतर सोलावूर, उरूळी कांचन मार्गे बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

– हडपसर ते सासवड दरम्यान दिवेघाट वाहतुकीस बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक बोपदेव घाट मार्गे वळविण्यात येणार आहे.

– स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक तसेच हडपसर अशा मार्गावर संचलन राहणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले.

Web Title :   Palkhi Sohala 2023 | special bus service from pmpml for shri sant dnyaneshwar tukaram maharaj palkhi sohala 2023 ceremony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी