Palkhi Sohala 2023 | उष्माघातापासून संरक्षणासाठी पालखी मार्गावर 27 ठिकाणी उभारण्यात येणार मंडप

 Palkhi Sohala 2023 | Tents will be erected at 27 places on Palkhi Marg for protection from heat stroke
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Sohala 2023 | महाराष्ट्रातील पवित्र आषाढी वारी लवकरच सुरु होणार आहे. येत्या 12 जून रोजी पुण्यनगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj) व श्री संत तुकाराम महाराजांच्या (Saint Tukaram Maharaj) पालखीचे आगमन होणार आहे. 12 व 13 मे रोजी पुण्यात (Pune) वैष्णवांचा हा मेळा जमणार आहे. तर पुणे जिल्ह्यात (Pune District) 18 ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, या प्रचंड उन्हाच्या झळांचा त्रास होवू नये म्हणून, प्रशासनातर्फे पालखी मार्गावर 27 ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहे. (Palkhi Sohala 2023 )

आषाढी वारीतील (Ashadhi Vari) लाखो वारकऱ्यांच्या सुखद व आरोग्यदायी वारीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून गरजेच्या उपाययोजना आखल्या जात आहे. पालखीमार्गात (Palkhi Marg) ठिकठिकाणी संरक्षणासाठी मंडप घालण्यात येणार असून जिल्हा परिषदेकडून (District Council) याबाबत काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे (Chandrakant Waghmare) यांनी ही माहिती दिली असून, त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असल्यास सपाटीकरण, साफसफाईची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीएसआरच्या (CSR) माध्यमातून व लोकसहभागातून मंडप उभारणीचा खर्च केला जाणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (Sri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla) मार्गावर चार ठिकाणी तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla) मार्गावर बारा
ठिकाणी मंडप असणार आहे. तसेच श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा
(Sri Sant Sopan Maharaj Palkhi Sohla) मार्गावर अकरा ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहेत.
विसावा आणि मुक्काम या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला हे मंडप असणार आहेत.
उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अधिकाऱ्यांना मार्गावर मंडप उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने मंडप उभा करण्याची ठिकाणे ठरवली जाणार आहेत. (Palkhi Sohala 2023)

या बरोबरच पालखीसाठी लागणाऱ्या इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
मंडप बांधणीबरोबर अनेक जेष्ठ भाविक वारीत हिरहिरीने सहभाग नोंदवतात.
त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी 112 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि 336 आरोग्य कर्मचा-यांच्या सहाय्याने मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.
आरोग्य सेवेसाठी 20 लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.
तसेच पालखी सोहळ्यादरम्यान दिडीप्रमुखांना 740 औषध किटचे (Medicine kit) वाटप करण्यात येणार आहे.

पालखी मुक्कामांच्या ठिकाणी तीन दिवस आधी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाकडून 5 कि. मी. परिसरात कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी धूरफवारणी केली जाणार आहे.
पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमधील 10 टक्के खाटा वारकऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
दोन्ही पालख्यांसमवेत आरोग्य चित्ररथ असणार आहे तसेच सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी मोठे बोर्ड, बॅनर
व फ्लेक्समार्फत आरोग्य योजनाची जनजागृती केली जाणार आहे.

Web Title :  Palkhi Sohala 2023 | Tents will be erected at 27 places on Palkhi Marg for protection from heat stroke

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | ‘…मग मंदिरातील उघडेबंब पुजाऱ्यांनी सदरा घालाव’, मंदिरातील ड्रेसकोड वादावर भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया

Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?

Total
0
Shares
Related Posts
Mahavikas-Aghadi

Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’