ज्योतिष : हातावरील जीवन रेषा देते ‘शुभ-अशुभ’ संकेत !

मुंबई : वृत्तसंस्था – हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार हातावरील काही रेषा महत्त्वाच्या मानल्या जातात. हातावरील उठावदारपणे दिसणाऱ्या तीन रेषा म्हणजे मस्तकरेषा, आयुष्यरेषा, हृदयरेषा महत्त्वाच्या मानल्या जातात. अंगठ्याच्या खालच्या खालील शुक्र पर्वताला घेरलेली रेषा ही आयुष्य रेषा असते. या रेषा काही शुभ-अशुभ संकेत आवश्य देतात. हातावरील आयुष्यरेषा कोणत्या व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ संकेत देते हा जाणून घेऊया.

जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर चक्रासारखे एखादे चिन्ह असेल तर ते खूप महत्तवपूर्ण असते. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील चक्राचे चिन्ह अंगठ्यावर असेल तर तो व्यक्ती खूप भाग्यशाली असतो. हातावर अशा प्रकारचे चिन्ह असलेला व्यक्ती धनवान होतो. अंगठ्यावर चक्र चिन्ह असल्यास व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न, प्रभावशाली, बुद्धीशी संबंधित कार्य करण्यास योग्य असतो. हे लोक बुद्धीचा योग्य वापर करून भरपूर धन प्राप्त करतात. हे लोक वडिलांना कामामध्ये मदत करत असतात. त्यांना कुटुंबामध्ये भरपूर मान-सन्मान मिळतो.

आयुष्य रेषेवर जर कोणत्याही प्रकारचा क्रॉस निशाण असले ते अशुभ मानले जाते. तसेच आयुष्य रेषेवर साखळी सारखी आकृती दिसत असेल तर हे संकेत चांगले मानले जात नाही. जर आयुष्य रेषा दोन भागांमध्ये विभागली असेल तर आणि दोन भागांमध्ये जास्त अंतर असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात जास्त संकट येऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या