ICC World Cup 2019 : चक्‍क ‘अंपायर’सह सर्वच क्रिकेटर मैदानावरच ‘झोपले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड कप दरम्यान सुरु असलेल्या श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका सामन्यात एक अजब थरार घडला, या सामन्या दरम्यान असा काही प्रकार घडला की, मैदानातील अंपायर बरोबरच सर्वच खेळाडूंना मैदानातच खाली झोपायला लागलं. याच मॅचमध्ये श्रीलंकेची टीम बॅटिंग करत होती. हा सामना शेवटच्या टप्प्यात असताना अचानक मैदानात मधमाशींनी आक्रमण केले.

काय घडला प्रकार –

ही घटना तेव्हा घडली जेव्हा पहिल्या टप्प्यातील ४७.५ ओवरचा खेळ संपत आला होता. तेव्हाच मधमाशांचा झुंड मैदानावर पांगला. यापासून वाचण्यासाठी मैदानावर उपस्थित अंपायर आणि सर्व खेळाडू थेट मैदानावरच झोपले. जो पर्यंत मधमाशा मैदानातून जात नाहीत. तो पर्यंत सर्व खेळाडू आपल्या तोंड लपवत मैदानावर झोपले. जवळपास २ ते ३ मिनिटांसाठी खेळ थांबला होता. त्यानंतर जेव्हा मधमाशा मैदानातून बाहेर गेल्या त्यानंतरच सामना पुन्हा सुरु झाला. सामन्या दरम्यान हा प्रकार पहिलांदाच घडला नाही.

या सामन्या दरम्यान दक्षिण अफ्रिका श्रीलंकेच्या विरोधात मोठा स्कोर करु शकली नाही. सर्व टीम ४९.३ ओवर मध्ये ऑलआऊट झाली. असे असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरने चांगली बॉलिंग केली. क्रिस मॉरिस आणि प्रिटोरिअस यांना ३-३ विकेट घेतल्या. तर रबाडाने दोन विकेट घेतल्या.

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण