प्रदूषणाबाबत अभिनेत्री ‘पामेला एंडरसन’नं व्यक्त केली ‘चिंता’, लिहिलं PM नरेंद्र मोदींना ‘लेटर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री पामेला एंडरसन हिनं भारतातील स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पामेलानं वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणात होणाऱ्या खतरनाक बदलांना पाहता चिंता व्यक्त केली आहे. तिनं पीएम मोदींना म्हटलं आहे की, त्यांनी देशातील वीगन लाईफस्टाईल प्रमोट करणं गरजेचं आहे. पेटाची डायरेक्टर पामेलानं पीएम मोदींना विनंती केली आहे की, त्यांनी डेअरी प्रॉडक्ट्स काढून सोया प्रॉडक्ट्स वापरायला हवेत. मटन आणि जनावरांशी निगडीत प्रॉडक्ट्स बॅन करायला हवेत. खासकरून सरकारी इव्हेंटवेळी.

भारतासमोर उभ्या आहेत अनेक गंभीर समस्या
52 वर्षीय पामेला म्हणते, “ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज सारख्या समस्या या गंभीर आहेत. यावर आता आपण वेळ वाया घालवू शकत नाहीत.” लेटेस्ट रिपोर्टबद्दल बोलताना ती म्हणाली, “2050 सालापर्यंत 36 मिलियन भारतीय क्लायमेट चेंजमुळे प्रभावित होऊ शकतात. याशिवाय वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे की, 2030 सालापर्यंत 40 टक्के भारतीय लोकसंख्येकडे पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसेल. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, पुढील वर्षीच 21 भारतीय शहरात ग्राऊंडवॉटर झिरो होऊ शकतं.”

‘मटन आणि डेअरी प्रॉडक्ट कंपन्या जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्या’
वीगिन्जमबद्दल बोलताना ती म्हणाली, “मटन आणि डेअरी प्रॉडक्ट कंपन्या जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्या बनताना दिसत आहेत. युएननं चेतावणी दिली आहे की, क्लायमॅट चेंजसोबत निपटण्यासाठी ग्लोबल स्तरावर वीगन लाईफस्टईलला प्रमोट करणं गरजेचं आहे. हा एकच पर्याय नाहीये परंतु आपल्या अस्तित्वसाठी गरजेचं झालं आहे.

या पत्राच्या शेवटी पामेलानं पीएम मोदींना विनंती केली आहे की, भारतानं न्यूझिलंड, चीन आणि जर्मनी यांसारख्या देशांच्या पावलावर पाऊल टाकायला हवं ज्यांनी त्यांच्या सरकारी कार्यक्रमात मांसावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

पामेलनं बिग बॉस 4 मध्ये एन्ट्री केली होती. याआधी तिनं कॅनडाच्या पंतप्रधानांनाही पत्र लिहलं होतं. ज्यात तिनं म्हटलं की, या देशातही वीगन खाद्यपदार्थ प्रमोट करणं गरजेचं आहे जे टेस्ट आणि न्यूट्रिशनमध्ये उत्तम आहे.

Visit : Policenama.com