PAN-Aadhaar Link पासून ITR फायलिंग पर्यंत… या महिन्यात ‘ही’ 5 कामे करणे आवश्यक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PAN-Aadhaar Link | मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवट नाही तर अशा अनेक महत्त्वाच्या मुदतीही या महिन्यात संपणार आहेत, ज्यांचा थेट संबंध तुमच्या पैशांशी आहे. यामध्ये विलंबित किंवा सुधारित प्राप्तीकर रिटर्न (ITR), पॅन-आधार लिंकिंग (PAN-Aadhaar link) आणि बँक खाते KYC अपडेट करण्याच्या शेवटच्या तारखांचा समावेश आहे.

 

काही इतर कामे आहेत जी तुम्ही या महिन्यात हाताळली पाहिजेत. अशाच पाच आवश्यक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

 

विलंबित किंवा सुधारित ITR फाइलिंग
AY2021-22 साठी विलंबित किंवा सुधारित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. त्यामुळे ज्यांनी आयटीआर भरण्यासाठी दिलेल्या देय तारखेपर्यंत आयटीआर भरलेला नाही, त्यांनी आता शेवटच्या तारखेपर्यंत त्यांचा प्राप्तीकर रिटर्न भरावा.

 

Aadhaar-PAN लिंक
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे. ज्यांचे पॅन आणि आधार लिंक नाही त्यांनी या आधी लिंक करावे. असे न केल्यास पॅन कार्ड अवैध ठरेल आणि अवैध पॅन वापरल्याबद्दल कलम 272B अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय बँक ठेवीच्या व्याजावरील टीडीएसही Tax Deducted at Source (TDS) दुप्पट केला जाईल. (PAN-Aadhaar Link)

बँक खाते KYC अपडेट
यापूर्वी, बँक खाते केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती. परंतु, देशातील वाढत्या ओमिक्रॉन प्रकरणांमुळे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक खाते KYC अपडेट करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली. आता लिंक न केल्यास बँक खाते गोठवू शकते.

 

आगाऊ कराचा हप्ता
प्राप्तीकर कायद्याच्या कलम 208 नुसार, प्रत्येक करदात्याचे अंदाजे कर दायित्व 10,000 रुपये किंवा त्याहून जास्त आहे, तो आगाऊ कर भरू शकतो, जो चार हप्त्यांमध्ये भरायचा आहे. त्याचा शेवटचा हप्ता जमा करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 आहे. त्यापूर्वी हे काम करा.

 

कर बचत गुंतवणूक
कर भरणार्‍या व्यक्तीकडे कर बचतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक आहे.
म्हणून, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ELSS म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन सिस्टीम किंवा NPS इत्यादी सारख्या कर बचत निधीमधील ठेवींची कसरत पूर्ण झाली आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.

 

Web Title :- PAN-Aadhaar Link | from pan aadhaar link to itr filing do these 5 things immediately in march2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! रविवारी अजित पवार यांच्याकडून पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 31 उद्घाटन; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

 

Advocate Praveen Chavan | छुपा कॅमेरा कोणी लावला? देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांबद्दल अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांचा मोठा खुलासा, म्हणाले…

 

Pune Crime | व्याजाने दिलेले पैसे न दिल्याने तरुणाचे भोसरीतून अपहरण; हवेली पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना घेतले ताब्यात