कामाची गोष्ट ! ‘या’ तारखेपर्यंत PAN कार्डला Aadhaar शी करा लिंक, अन्यथा होईल मोठी ‘अडचण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जर आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेला नसेल तर ही शेवटची संधी आहे. आयकर विभागाने पॅन व आधार जोडणीची अंतिम तारीख 31 मार्च 2020 पर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाच्या या आदेशानंतर सर्व पॅनकार्डधारकांनी त्यांचा पॅन आणि आधार वेळेत जोडणे आवश्यक झाले आहे. यावेळी, जर आपण 31 मार्च 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार असून आपला पॅन प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत अवैध केला जाईल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पॅनकार्ड लिंक नसेल तर आयटीआर ऑनलाईन भरणे कठीण होईल. तसेच आपला कर परतावा अडकू शकतो. या व्यतिरिक्त आपण कोणतेही आर्थिक व्यवहार करता त्यावेळी आपण पॅन वापरण्यास सक्षम राहणार नाही.

कसे कराल लिंक :
आपण आयकर ई-फाइलिंग पोर्टलद्वारे किंवा एसएमएसद्वारे देखील पॅन आणि आधार लिंक करू शकता. प्राप्तिकराच्या ई-फाईलिंग पोर्टलवर आधार लिंकचा एक विभाग आहे. आपल्याला आपला पॅन आणि आधार क्रमांक येथे प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर त्यास ओटीपीद्वारे लिंक केले जाऊ शकते. तसेच दुसर्‍या पर्यायामध्ये आपण 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवू शकता. यासाठी तुम्हाला यूआयडीपीएएन < 12 आकडी आधार क्रमांक> व < 10 अंकांचा पॅन क्रमांक प्रविष्ट करावा लागेल व तो दिलेल्या नंबरवर पाठवावा लागेल.

ऑनलाइन लिंक कसे करावे :
1. सर्वप्रथम, जर आपले खाते तयार केले नसेल तर पहिल्यांदा रजिस्टर करा.
2 . प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाइटला भेट द्या (www.incometaxindiaefiling.gov.in).
3. त्यांनतर वेबसाइटवर ‘लिंक आधार’ असा पर्याय दिसेल. त्यावर लॉगिन नंतर, आपल्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंग्जवर जा.
4. प्रोफाइल सेटिंग्जमध्ये, तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिसेल, तो निवडा.
5 . येथे दिलेल्या विभागात तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
6. खाली दिलेल्या ‘लिंक लिंक’ पर्यायाची माहिती भरल्यानंतर.
7. यानंतर आपला आधार लिंक केला जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like