Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन ‘डेडलाईन’

नवी दिल्ली : Pan-Aadhar Linking | केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्वाची दोन कागदपत्र आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. याची डेडलाईन सहा महिन्यापर्यंत वाढवली आहे. आता तुम्ही 31 मार्च 2022 पर्यत ही दोन्ही महत्वाची कागदपत्र एकमेकांशी लिंक करू शकता. यापूर्वी ही डेडलाईन 30 सप्टेंबर 2021 ला संपणार होती. (Pan-Aadhar Linking)

 

31 मार्च 2022 आहे डेडलाईन

ही डेडलाईन वाढवण्यास प्राप्तीकर कायद्यांतर्गत दंड प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख सुद्धा वाढवून 31 मार्च 2022 केली आहे. केंद्र सरकारने बेनामी मालमत्तेच्या व्यवहारावर सक्षम अधिकार्‍याद्वारे नोटीस जारी करणे आणि आदेश पारित करण्याची शेवटची तारीख सुद्धा वाढवली आहे. मात्र, कोणत्याही असुविधेपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर हे दोन कागदपत्र लिंक करणे आवश्यक आहे.

पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आता यासाठी  31 मार्च 2022 पर्यंत वेळ दिला आहे.
जर लिंकिंग 31 मार्च 2022 पर्यंत केले नाही तर इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट अंतर्गत गंभीर परिणामांतर्गत तुमच्यावर 10000 रुपयांचा दंड सुद्धा लागू शकतो.

सीबीडीटीने म्हटले आहे की, जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत आहेत,
त्यांच्यासाठी पॅनकार्डला आधार जोडणे अनिवार्य आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या आधार योजनेला संविधानिक दृष्ट्या वैध केले होते.

Web Title : PAN-Aadhaar Linking | government extends the deadline for linking pan card with aadhaar from 30 september 2021 to 31 march 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update