PAN Aadhaar Linking | सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी आवश्यक ! तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PAN Aadhaar Linking | आधार कार्ड आणि पॅन कार्ड देशातील खुप महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्यापासून मोठ्या बँकिंग ट्रांजक्शनसाठी पॅन कार्ड (PAN Card) असणे आवश्यक आहे. याशिवाय सुद्धा इतर अनेक फायनान्शियल कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य (PAN Aadhaar Linking) आहे.

इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) पॅन-आधार लिंक (PAN Aadhaar Linking) करण्याची डेडलाईन 31 मार्च 2022 ठरवली आहे. जर पॅन कार्डला आधार कार्डसोबत या तारखेपर्यंत लिंक केले नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो. पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घेवूयात :

31 मार्चनंतर इनअ‍ॅक्टिव्ह होईल पॅन कार्ड

CBDT ने पॅन-आधार लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. जर एखाद्या व्यक्तीने अंतिम तारखेपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक नाही केले, तर त्याचे पॅनकार्ड आयकर विभाग निष्क्रिय घोषित करणार आहे. निष्क्रिय पॅनकार्डवरून आयटीआर फाइल करने, बँक अकाऊंट उघडणे आणि पेमेन्ट करण्यासारखी कामे करता येणार नाहीत. जर एखादी व्यक्ती निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डचा वापर करताना आढळली तर त्यास 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

ऑनलाइन असे करू शकता लिंक

सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

एसएमएसने असे करू शकता लिंक

एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

निष्क्रिय पॅन असे करा सुरू

निष्क्रिय पॅन कार्ड सुरू करता येऊ शकते. यासाठी एक एसएमएस करावा लागेल. मेसेज बॉक्समध्ये जाऊन रजिस्टर्ड मोबाइलवरून 12 अंकांचा पॅन नंबर टाकल्यानंतर स्पेस देऊन आधार नंबर एंटर करा आणि 567678 किंवा 56161 पर एसएमएस करना होगा.

 

या पाच कामांसाठी आहे अतिशय आवश्यक

1. स्थिर मालमत्ता खरेदीसाठी

2. क्रेडिट कार्डसाठी

3. इन्श्युरन्स प्रीमियमसाठी

4. 50 हजारपेक्षा जास्तीच्या ट्रांजक्शनसाठी

5. टीडी किंवा एफडीसाठी

 

Web Title : PAN Aadhaar Linking | pan aadhaar linking process check full details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jayant patil | अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत (व्हिडीओ)

Pune Police Crime Branch | पुण्यातील ‘न्यू रायजिंग गँग’चा म्होरक्या विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघे गोत्यात, गुन्हे शाखेकडून कारवाई

Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महोत्सव प्रारंभ ! बागुल कुटुंबीयांतर्फे घटस्थापने दरम्यान लक्ष्मीमातेस 25 किलोची चांदीची साडी अर्पण (व्हिडिओ)