30 कोटींनी केलं त्यांचं PAN कार्ड ‘आधार’ शी लिंक ! कशामुळं गरजेचे हे सरकारनं लोकसभेत सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने २७ जानेवारी २०२० पर्यंत ३० कोटी ७५ लाख २ हजार ८२४ लोकांचे पॅनकार्ड आधारशी लिंक केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात याबाबतची माहिती लोकसभेत दिली. ते म्हणाले की पॅनकार्डला आधारशी जोडण्याचा मूळ उद्देश म्हणजे बनावट पॅनकार्ड वर आळा घालणे हा आहे. संसदेने सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आधार आणि पॅन कार्ड जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी ही तारीख ३१ डिसेंबर २०१९ होती.
अजून इतर प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी संसदेला सांगितले आहे की २४ जानेवारी २०२० पर्यंत ८५ टक्के बचत आणि चालू बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ५९.१५ कोटी रूपे कार्ड बँकांनी जारी केले आहेत.
सरकारने सांगितले की का आवश्यक आहे आधार ला पॅनकार्ड जोडणे
सरकारचे म्हणणे आहे की ही लिंक करण्याची प्रक्रिया पॅनचा गैरवापर आणि संभाव्य कर घोटाळा टाळण्यासाठी आवश्यक आहे. तसेच यामुळे मल्टीपल पॅन कार्ड बनविणे देखील थांबेल. पॅनला आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी ३० सप्टेंबरची तारीख निश्चित केली होती, जी नंतर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली.
आपल्या आधारला पॅनकार्ड बरोबर कसे लिंक कराल
१) जर आपण आयकर विभागाच्या वेबसाईटवरून आधार – पॅन ला लिंक करू शकत नसाल तर याचे अजून काही पर्याय आहेत.
२) एसएमएसद्वारे असे लिंक करा कार्ड
आपण फक्त एसएमएस पाठवून देखील आपले आधार पॅन कार्डला लिंक करू शकता. आपल्याला हा एसएमएस ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवायचा आहे.
३) आपल्याला एसएमएस असा पाठवायचा आहे
UIDPAN<स्पेस><१२ अंकी आधार नंबर><स्पेस><१० अंकी पॅन नंबर> उदाहरणार्थ आपला आधार क्रमांक ११११२२२२३३३३ आहे आणि पॅन नंबर.
४) आधार नंबरला पॅनकार्डशी जोडण्याकरिता आपल्याला ई-फाइलिंग च्या वेबसाइट (https://incometaxindiaefiling.gov.in/) वर जावे लागेल आणि सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया :
१) आपण या वेबसाइटला प्रथमच भेट देत असल्यास प्रथम **Register Here** वर क्लिक करा. यानंतर पॅनची माहिती दिल्यानंतर ओटीपी पडताळणीनंतर पासवर्ड तयार करा. यानंतर आपल्याला लॉग इन करावे लागेल.
२) आपल्याकडे आधीपासूनच खाते असल्यास, **Login here** वर क्लिक करा.
३) युजरआयडीमध्ये आपल्याला आपला पॅन क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. नंतर पासवर्ड प्रविष्ट करा आणि नंतर कॅप्चा कोड टाका. शेवटी **Login** वर क्लिक करा.
४) यानंतर एक पॉप अप विंडो समोर येईल ज्यामध्ये आपल्याला आधार क्रमांकास लिंक करण्यास सांगितले जाईल. यानंतर आधार क्रमांक टाकावा आणि त्यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा. शेवटी **Link now** वर क्लिक करा.
५) जर आपणास पॉपअप विंडो दिसत नसेल तर काळजी करू नका. आपण अजूनही दोन्ही क्रमांकाना सहजपणे लिंक करू शकता. यासाठी, टॉप मेनूमध्ये दिसणार्या प्रोफाइल सेटिंग्जवर जा. यानंतर **Link Aadhaar** या पर्यायावर क्लिक करा.
६) यानंतर आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि नंतर **Save** वर क्लिक करा.
महत्वाच्या गोष्टी
– ही पद्धत तेव्हाच काम करेल जेव्हा पॅनकार्ड आणि आधार कार्डचा तपशील पूर्णपणे जुळेल. ज्या लोकांच्या दोन्ही कार्डचे तपशील पूर्णपणे जुळत नाहीत त्यांच्यासाठी सरकारने ही व्यवस्था सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.
– यासाठी तुम्हाला तुमच्या पॅनकार्डची फक्त स्कॅन कॉपी देणे आवश्यक असणार आहे. याशिवाय कर विभागही यासंदर्भात ऑनलाइन पर्याय देण्याची योजना आखत आहे. ते आपल्या ई – फाइल पोर्टलवर कर भरणाऱ्यांना आधार जोडण्याचा पर्याय देईल.
– या पर्यायात तुम्हाला तुमचे नाव न बदलता वन टाइम पासवर्ड चा पर्याय निवडावा लागेल.
– हा पर्याय निवडण्यासाठी आपणास दोन्ही कागदपत्रांमध्ये नमूद केलेली जन्मतारीख द्यावी लागेल आणि त्याच्या जुळणीवरून ऑनलाइन आधारमधून पॅनला जोडता येईल. असे दिसत आहे की हा पर्याय अद्याप उपलब्ध झालेला नाही.