खुशखबर ! आता PAN कार्ड शिवाय करता येणार पैशांची ‘देवाण-घेवाण’, सरकारनं जारी केले नवीन नियम, जाणून घ्या
नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत नवा नियम बनवला.
केंद्र सरकारने इनकम टॅक्स फॉर्ममध्ये काही बदल केले आहेत. सरकारने देखील हे निश्चित केले की नियमात या बदलानंतर कोणत्याही व्यक्तीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. 1 सप्टेंबर 2019 नंतर इनकम टॅक्ससाठी तुम्ही पॅन कार्डच्या जागी आधार कार्डचा वापर करु शकतात. याआधी अर्थसंकल्पात निर्मला सितारामण यांनी घोषणा केली होती की पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डाचा वापर करता येईल.
आधार कार्ड द्वारे भरता येईल इनकम टॅक्स रिटर्न –
सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे जर कोणाकडे पॅन कार्ड नसेल तर ते त्या जागी आधार कार्डचा वापर करु शकतात. म्हणजेच आता तुम्ही पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डच्या मदतीने इनकम टॅक्स रिटर्न भरु शकतात. जेथे जेथे पॅन कार्ड आवश्यक आहे तेथे तेथे पर्याय म्हणून आधार कार्डचा वापर करतात येईल.
मोठ्या व्यवहारासाठी आधारचा वापर –
जर एखाद्या वित्त वर्षात एखाद्या व्यक्तीची कमाई आयकरच्या दरात येत नसेल तर आयकर भरणे अनिवार्य नाही. नवे नियम लागू झाल्यानंतर आता पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करता येईल. इनकम टॅक्स रिटर्नशिवाय पॅनचा वापर मोठ्या व्यवहारावेळी करण्यात येत होता.
फॉर्म्स मध्ये झाले बदल –
इनकम टॅक्स अॅक्ट 1962 अंतर्गत येणाऱ्या नियमात बदल करुन फॉर्म नंबर 3AC, 3AD, 10CCB, 10CCBA, 10CCBB, 10CCBBA, 10CCBC इत्यादीमध्ये बदल करण्यात आले आहेत, या फॉर्ममध्ये जेथे पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर लिहिता येईल.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या