‘या’ 13 कामांसाठी खुपच महत्वाचं PAN कार्ड, जाणून घ्या सर्व संबंधित गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅनकार्डचा वापर हा विविध ठिकाणी करावा लागतो. वेतन मिळण्यापासून ते पैसे काढेपर्यंत सर्व गोष्टींसाठी पॅनकार्ड फार महत्वाची गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला याचा वापर नेमका कशासाठी केला जातो, याबद्दल माहिती देणार आहोत. तर चला जाणून घेऊयात…

या महत्वाच्या कामांसाठी होतो पॅनकार्डचा वापर

(1) शेअर खरेदी करण्यासाठी किंवा 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे.

(2) पाच लाख रुपयांपेक्षा आधिक रकमेची संपत्ती खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.

(3) पाच लाख रुपयांच्या वरील सोनेखरेदीसाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.

(4) बॉण्ड किंवा डिबेंचर खरेदी करंटसाठी किंवा एखाद्या संस्थेला 50 हजार रुपये देण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे.

(5) वाहनांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी पॅनकार्ड गरजेचे आहे. दुचाकी व्यतिरिक्त कोणत्याही गाडीच्या खरेदी आणि विक्रीसाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.

(6) बँकेत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करायची असेल तर पॅनकार्ड अत्यावश्यक आहे.

(7) पोस्ट ऑफिसमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करायची असल्यास पॅनकार्ड गरजेचे आहे.

(8) 1 लाख रुपयांच्या किमतीवरील वस्तू खरेदी करताना पॅनकार्ड गरजेचे आहे.

(9) कोणत्याही बँकेत खाते खोलण्यासाठी पॅनकार्ड अंत्यंत गरजेची गोष्ट आहे.

(10) फोनचे नवीन कनेक्शन घेतेवेळी पॅनकार्ड अत्यावश्यक आहे.

(11) हॉटेलमध्ये एका दिवसाचा खर्च हा 25 हजार रुपयांच्या वर गेल्यास तुम्हाला बिल भरताना पॅनकार्ड दाखवणे गरजेचे आहे.

(12) इ दिवसात 50 हजार रुपयांच्या वर रकमेचा व्यवहार करायचा असल्यास किंवा चेक भरायचा असल्यास तुम्हाला पॅनकार्ड गरजेचे आहे.

(13) विदेशात प्रवास करताना तुम्ही तिकीटाची रक्कम भरताना 25 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख भारत असल्यास तुम्हाला पॅनकार्ड गरजेचे आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार