PAN Card Fake or Original | PAN कार्ड बनावट आहे की खरे? तुमच्या फोनचा कॅमेरा करेल खुलासा, जाणून घ्या ट्रिक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PAN Card (पर्मनंट अकाऊंट नंबर) एक महत्वाचे कागदपत्र आहे, ज्याचा वापर सर्व प्रकारच्या फायनान्शियल व्यवहारात होतो. अनेकदा आपण खरे आणि बनावट पॅनकार्डमध्ये फरक (PAN Card Fake or Original) करू शकत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का, स्मार्टफोनद्वारे कुणीही व्यक्ती शोध घेऊ शकतो की पॅनकार्ड खरे आहे की बनावट. कारण, पॅनकार्डवर जो QR Code (क्विक रिस्पॉन्स कोड) असतो, तो यासाठी मदत करतो. (PAN Card Fake or Original)
या संपूर्ण प्रक्रियेसाठी केवळ पॅनकार्ड आणि एका स्मार्टफोनची गरज आहे. लक्षात ठेवा की, कॅमेरा किमान 12-मेगापिक्सलचा असावा. याशिवाय प्राप्तीकर विभागाचे एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर अॅपद्वारे पॅनकार्ड स्कॅन करून ते बनावट की खरे ओळखू शकता. (PAN Card Fake or Original)
असे जाणून घ्या पॅनकार्ड Original आहे की Fake
स्टेप 1 : आपल्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवर जा आणि PAN QR Code Reader सर्च करा.
Step 2 : अॅप डाऊनलोड करा, ज्याचा डेव्हलपर NSDL e-Governance Infrastructure Limited आहे.
स्टेप 3 : पॅन क्यूआर कोड रिडर अॅप डाऊनलोड करा, आणि उघडा.
Step 4 : अॅप लोड झाल्यानंतर, कॅमेरा व्ह्यूफायंडरवर हिरव्या रंगाचे प्लससारखे ग्राफिक दिसेल.
स्टेप 5 : कॅमेरामध्ये पॅनकार्डचा क्यूआर कोड दाखवा.
Step 6 : कॅमेरा क्यूआर कोड डिटेक्ट करेल, फोनमध्ये बीप आवाज आणि व्हायब्रेशन जाणवेल.
स्टेप 7 : यानंतर पॅनकार्डची डिटेल्स दिसेल. चेक करा की अॅपमध्ये दाखवलेला तपशील कार्डसोबत जुळत आहे. जर तो थोडा वेगळा असेल तर पॅनकार्ड ओरिजनल नाही.
Step 8 : जर पॅनकार्डमध्ये वेगळी माहिती दिसून आली तर प्राप्तीकर विभागाच्या वेबसाइटवरून एक नवीन पॅन कार्ड मागवा.
Web Title :- PAN Card Fake or Original | pan card fake or original your phone camera can revealed know the trick
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण