PAN Card | पॅन कार्ड गहाळ झालेय, ‘या’ सोप्या पद्धतीने कोणत्याही कागपत्राशिवाय काढा नवीन PAN Card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोणत्याही शासकीय योजनांसाठी किंवा ऑनलाइन व्यवहारांसाठी आधार कार्ड (Aadhaar card) अनिवार्य आहे. याशिवाय पॅन कार्ड (PAN Card) देखील गरजेचं आहे. पॅन कार्ड मध्ये (PAN Card) 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर (Alphanumeric number) असतो. तो नंबर व्यवहारांसाठी अतिशय गरजेचा असतो. मात्र, अनेकवेळा पॅन कार्ड गहाळ झाल्यानंतर ग्राहकांना ते पुन्हा कसे मिळवायचे किंवा त्याद्वारे व्यवहार कसा करायचा हा प्रश्न पडतो.

 

मात्र आता केंद्र सरकारने (Central Government) ग्राहकांसाठी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याचे नियम जारी केल्यामुळे या ऑनलाइन व्यवहारांच्या प्रक्रियेत सुसुत्रता येत आहे. ज्यावेळी ग्राहकाकडे PAN Card नसेल, त्यावेळी केवळ आधार कार्डच्या सहाय्याने व्यवहार करता यऊ शकतात. तरीदेखील KYC करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. अशावेळी ग्राहक इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकतात. त्यासाठी सोप्या स्टेप्स आहेत.

 

कसं मिळवायचं पॅन कार्ड?

 

पॅन कार्ड साठी इन्कम टॅक्स पोर्टलच्या (Income tax portal) वेबसाईटवर जाऊन इन्स्टंट पॅन कार्डच्या (Instant PAN card) ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर E Pan चा पर्याय ओपन होतो. त्यासाठी Get New E-PAN या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपला वैयक्तिक आधार नंबर टाका. त्यानंतर स्क्रिनवर खालीलपैकी काही पर्याय उपलब्ध होतील.

 

  • यापूर्वी कधीही पॅन कार्ड मिळालेलं नाही
  • चालू मोबाईल नंबर हा आधार कार्डाशी लिंक केलेला आहे.
  • आधार कार्डवर जन्मदाखल्याची सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • पॅन कार्डसाठी वयोमर्यादा पूर्ण केलेली नाही.

 

यापैकी आवश्यक असलेल्या पर्यांना निवडून OK केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर 15 अंकी Acknowledgment नंबर जनरेट होईल. त्यानंतर तयार झालेल्या नव्या पॅन कार्डची प्रत ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल. तुम्ही आधार कार्डला दिलेला ई-मेल आयडी ओपन करुन नवीन पॅन कार्ड डाऊनलोड करु शकता.

 

Web Title : PAN Card | get pan card without any documents pan card apply online check process know more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shankarrao Gadakh | शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी

Pune Crime | पुण्यात खंडणी मागितल्याची तक्रार केल्याच्या रागातून भरदिवसा व्यावसायिकावर सपासप वार

Nawab Malik | ‘है तैयार हम’ ! ‘फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे’