Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक भारतीयासाठी पॅन कार्ड (Pan Card Online Application ) आवश्यक कागदपत्र आहे. हे प्राप्तीकर विभागाकडून दिले जाते. पॅनकार्ड आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असते. पॅनकार्ड (Pan Card Online Application) कोणत्याही व्यक्तीच्या पैशाचा इनफ्लो आणि आऊटफ्लो ट्रॅक करण्यासाठी उपयोगी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र, आता नवीन पॅनकार्ड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ किंवा कालावधी जात नाही. तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबरद्वारे काही मिनिटांत इन्स्टंट पॅन कार्ड तयार करु शकता. जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्याच्या सुविधेसंदर्भात.

पॅनकार्ड म्हणजे काय ?

पॅन, अर्थात पर्मनन्ट अकाउन्ट नंबर हा भारतीय नागरिकाची ओळख आहे. या 10 आकडी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षरे असतात. भारतीय आयकर कायदा, 1961 अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो. पॅन आयकर विभाग देतो. इन्स्टंट पॅन कार्डसाठी आधार कार्डद्वारे अर्ज केल्यास केवळ 10 मिनिटांत पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड तुम्हाला मिळते.

असं मिळवा ऑनलाइन पॅन कार्ड

– सर्वात अगोदर Incometax.gov.in या साईटवर जावा
– त्यानंतर तुम्हाला Instant E-Pan हा ऑप्शन दिसेल, तेथून तुम्ही Instant Pan Card साठी अर्ज करु शकता.
– नवीन पॅनकार्ड मिळवण्यासाठी Get New-ePIN वर क्लिक करा
– त्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागितला जाईल, आधार नंबर एंटर करुन Continue च्या ऑप्शनवर क्लिक करा.
– यानंतर वेरिफिकेशन (Verification) होईल आणि तुम्हाला आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी (OTP) पाठवला जाईल.
– मिळालेला ओटीपी नंबर फिल करुन त्याला कन्फर्म (Confirm) करावं लागेल.
– ओटीपी कन्फर्म केल्यानंतर वेबसाईटवर आधार कार्डाशी संबंधित माहिती दिसू लागेल.
– त्यानंतर तुम्हाला आईडी वगैरे वेरिफाय करुन ओकेवर क्लिक करायचे आहे.

पॅन कार्ड कसे डाऊनलोड करायचे ?

तयार झालेले नवीन पॅन कार्ड पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड (Download in PDF format) करु शकता. यासाठी चेक स्टेटस (Check status) किंवा डाऊनलोड पॅनवर तुमचा आधार नंबर नोंदवावा लागेल. याशिवाय तुमचा ई-मेल आयडी (Email ID) आधार क्रमांकाशी संलग्न असेल तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मधील पॅन कार्ड तुमच्या ई-मेल वर उपलब्ध होईल.

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

 

 

Web Titel : Pan Card Online Application | how to make pan card online check full process of instant pan card