PAN Card धारकांनो लक्ष द्या ! 1000 रुपये वाचवण्याची मिळत आहे संधी, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पॅन कार्ड (PAN Card) होल्डर असाल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. ही बातमी तुमच्या फायद्याची सुद्धा आहे, कारण तुमचे 1000 रुपयांपर्यंत वाचू शकतात. सरकारने पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड (Aadhaar card) 31 डिसेंबर 2021 पर्यंत लिंक करण्याची (Aadhaar PAN link last date) शेवटची तारीख होती. (PAN Card)

ज्या लोकांनी या तारखेपर्यंत आपले पॅनकार्ड आधारकार्डसोबत जोडले नाही, त्यांच्यासाठी 1000 रुपये दंडाचा नियम आहे. अशावेळी 1000 रुपयांसह इतर अनेक समस्या टाळायच्या असतील तर ताबडतोब पॅन आणि आधार कार्ड लिंक करा. आता PAN-Aadhaar Link deadline 31 मार्च 2022 आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक न करणार्‍यांवर दंडाची तरतूद करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात विशेष नियम केला आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने यासाठी वित्त विधेयक मंजूर केले होते. जे पॅन कार्ड आणि आधार लिंक करणार नाहीत, त्यांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल, असा नियम विधेयकात होता. यासाठी प्राप्तीकर (Income Tax) कायद्यात नवीन कलम 234H जोडण्यात आले आहे.

नियमात केली सुधारणा

प्राप्तीकर कायद्याच्या नवीन कलमानुसार, पॅन आणि आधार कार्ड निर्धारित कालावधीत लिंक करणे आवश्यक आहे, असे नियमात म्हटले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने असे केले नाही तर त्याच्याकडून दंड म्हणून रक्कम वसूल केली जाईल, जी कमाल 1000 रुपयांपर्यंत असू शकते.

हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड लिंक करणे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पॅन-आधार लिंक न केल्याने होणारे तोटे

पॅन-आधार लिंक (आधार पॅन लिंकची शेवटची तारीख) न केल्याचा तोटा हा केवळ हजार रुपयांचा दंड नाही.
पॅनकार्डधारकाला अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जर ही दोन कागदपत्रे जोडली गेली नाहीत तर पॅन अवैध होईल आणि त्याच्याशी संबंधित सर्व कामे थांबतील.

यामुळे, म्युच्युअल फंड-शेअर्समध्ये गुंतवणूक करता येणार नाही किंवा ते कोणतेही नवीन बँक खाते उघडू शकणार नाहीत.
तसेच तुम्ही केवायसी करू शकणार नाही. या प्रकारच्या कामासाठी वैध पॅन कार्ड आवश्यक आहे.

तुमचे पॅन कार्ड अवैध असल्यास, तुम्ही ते वापरू शकत नाही.
प्राप्तीकर कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने अवैध पॅन कार्ड वापरले तर मूल्यांकन अधिकारी त्याच्यावर 10,000 रुपयांचा दंड लावू शकतात.

जर पॅन कार्ड अवैध ठरले तर एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरू शकत नाही.
त्यामुळे पॅन कार्ड धारकाने पॅन-आधार लिंक शेवटच्या तारखेपूर्वी (PAN-Aadhaar link last date) करून घेणे आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
असे केल्याने दंड टाळता येईल आणि शेअर्स, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहील.

Web Title :-  PAN Card | pan aadhaar link last date is 31 march 2022 link pan with aadhaar to avoid rs 1000 penalty

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलिस निरीक्षक, 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या