PAN Card | पॅन कार्ड यूजर्सने व्हावे अलर्ट! कधीही करू नका ‘ही’ चूक, अन्यथा एका फटक्यात होईल 10 हजारांचा दंड

नवी दिल्ली : पॅन कार्ड (PAN Card) एक अनिवार्य डॉक्युमेंट आहे. या कार्डशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहाराचे काम होऊ शकत नाही. याची गरज प्रत्येक आर्थिक देवाण-घेवाण करताना भासते. बँकेपासून ऑफिसपर्यंत याच्याशिवाय कोणतेही आर्थिक काम करू शकत नाही. पॅनकार्ड आता आधार आणि सर्व ठिकाणी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पॅन कार्डसंबंधी (PAN Card) एका चुकीने तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो, ही चूक कोणती ते जाणून घेवूयात…

दोन कार्ड असल्यास होईल अडचण

कुठेही पॅन नंबर (PAN Number) टाकताना पॅनकार्डवरील दहा आकडी नंबर अतिशय काळजीपूर्वक टाका. यामध्ये कोणतीही स्पेलिंग मिस्टेक किंवा नंबर इकडे-तिकडे करू नका अन्यथा मोठी पेनल्टी लागू शकते.

यासोबतच, जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड (PAN Card) असतील तरीसुद्धा मोठा दंड भरावा लागू शकतो. यामुळे तुमचे खाते फ्रीज होऊ शकते. यासाठी जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर ताबडतोब आपले दुसरे पॅन कार्ड विभागाकडे सरेंडर करा. यासाठी इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 272 बी मध्ये दंडाची तरतूद आहे.

असे करा दुसरे कार्ड सरेंडर

PAN सरेंडर करण्यासाठी कॉमन फॉर्म आहे. तो तुम्ही इन्कम टॅक्स वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता. यासाठी वेबसाइटवर Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करू शकता. यानंतर फॉर्म भरून कोणत्याही NSDL कार्यालयात जाऊन जमा करा.

दुसरे पॅनकार्ड (PAN Card) सरेंडर करताना फॉर्मसोबत ते सुद्धा जमा करा.
असे तुम्ही ऑनलाइन सुद्धा करू शकता.
एकाच पत्त्यावर एकाच व्यक्तीच्या नावावर आलेली दोन वेगवेगळी पॅनकार्ड या श्रेणीत येतात.
तुमच्याकडे सुद्धा दोन पॅनकार्ड असतील तर एक सरेंडर करावे लागेल.

हे देखील वाचा

Dangerous Apps | ‘हे’ 7 अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ! Google ने बॅन केलीत, आता तुम्ही सुद्धा तात्काळ करा डिलिट

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pan card latest news customers alert this mistake on pan card can put penalty of 10000 rupees know here detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update