सावधान ! ‘हे’ काम केलं नसेल तर तात्काळ करा, अन्यथा PAN कार्ड होणार रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही तुमचे PAN कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड लवकरच रद्द होऊ शकते. हे कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबर २०१९ आहे. मात्र PAN कार्ड रद्द झाल्यास आयकर विभागाकडून ते ग्राह्य धरण्यात येणार नाही.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) च्या एका आधिकाऱ्याने सांगितले की, असे होऊ शकत नाही की देशातील २० कोटी पॅन कार्ड धारकांकडे आधार कार्ड नसेल. देशात ४३ कोटी पॅनकार्ड धारक आहेत, तर १२० कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. ज्या करदात्यांना ३१ जुलै २०१९ आधी आयकर भरायचा आहे ते विना पॅनकार्ड आधार कार्डला लिंक केल्याशिवाय टॅक्स भरु शकत नाही. म्हणजे ३१ जुलै आधी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

Adhar-PAN

लिंक केले नाही तर काय होईल –
जर दिलेल्या अंतिम तारखे पर्यंत तुमचे पॅनकार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर आयकर कलम १३९ एए च्या अंतर्गत पॅन कार्ड रद्द ठरवण्यात येईल. जर तुम्ही पॅनकार्ड जोडले नाही तर तुम्हाला ऑनलाइन ITR फाइल करता येणार नाही. तुमच्या कर रिफंडमध्ये अडकू शकतो आणि तुमचे पॅन कार्ड अवैध होऊ शकते.

असे लिंक करा पॅनला आधार –
१. यासाठी सर्वात आधी आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईट वर जा (www.incometaxindiaefiling.gov.in).
२. तेथे तुम्हाला लाल रंगाची एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. तुमचे अकाऊंट नसल्यास तेथे रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर निळ्या पटीतील प्रोफाईल सेटिंग निवडा.
४. प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय मिळेल. त्याला सिलेक्ट करा.
५. तेथे आधार कार्ड नंबर टाका आणि त्या दिलेली इतर माहिती भरा.
६. त्यानंतर खाली दिलेल्या लिंक आधार यावर क्लिक करा.

मोबाईलच्या माध्यमातून लिंक करा आधार –
तुम्ही यासाठी SMS आधारित सेवेचा देखील लाभ घेऊ शकतात आणि आपले पॅन लिंक करु शकतात. आयकर विभागाने सांगितले आहे की ५६७६७८ किंवा ५६७६१ यावर SMS करुन तुम्ही आधार देखील लिंक करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य