घर बसल्या PAN कार्डमधील माहिती करा अपडेट, ‘ही’ एकदम सोपी पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची वेळ आली आहे, यासाठी सर्वप्रथम पॅन कार्डची गरज असते. बँक किंवा व्यवहारांशी संबंधीत कामात सुद्धा पॅन जरूरी असते. अशावेळी जर तुम्हाला पॅन कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा इतर माहिती अपडेट करायची असेल तर यासाठी बाहेरील कोणत्याही सेंटरवर फेर्‍या मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या सुद्धा पॅन अपडेट करू शकता. जाणून घ्या यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

या वेबसाइटवर सर्व्हिस टॅबवर जाऊन PAN वर क्लिक करा.

यानंतर Changes or Correction in existing PAN Data / Reprint of PAN Card वर क्लिक करा. मागण्यात आलेली माहिती भरल्यानंतर कॅप्चा कोड सबमिट करा.

यानंतर अ‍ॅप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा.

ई-केवायसीद्वारे तुम्ही डॉक्युमेंट जमा करू शकता. परंतु, यासाठी आधार कार्डची गरज भासते. ई-साईनद्वारे तुम्ही स्कॅन फोटो सबमिट करू शकता. सबमिटनंतर पेमेंट करावे लागेल, जे तुम्हाला ऑनलाइनच करावे लागेल.

पमेंट करण्यासाठी तुम्हाला पे कन्फर्मवर क्लिक करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बँक रेफरन्स नंबर आणि ट्रांजक्शन नंबर मिळेल. हे दोन्ही सेव्ह करा किंवा कंटीन्यूवर क्लिक करा.

यानंतर आधार कार्डच्या बॉक्सवर टिक करा आणि नंतर ऑथेंटीकेटवर क्लिक करावे लागेल. यानंतर जर तुमची माहिती आधार कार्डशी जुळत असेल तर कंटीन्यू विथ ई-साईन आणि ई-केवायसीवर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला जनरेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.

यानंतर ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला अ‍ॅप्लीकेशन फॉर्म दिसेल. तो पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करा. तो मेलद्वारे सुद्धा मिळू शकतो.

यानंतर आयडी प्रूफ सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एनएसडीएल ई-गव्हर्मेंट ऑफिसमध्ये पाठवावे लागतील.