Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात हळूहळू कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) शुक्रवारपासून (दि. 25) प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सेवा पूर्ववत झाल्याने मुंबई- नाशिक अप-डाऊन प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय थांबणार असून दिलासा मिळणार आहे. panchavati express and jan shatabdi express for mumbai nashik travel will start soon

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) बंद असल्याने अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस देखील सुरू केली जाणार आहे. दरम्यान मुंबई-पुणे प्रवासासाठी डेक्कन क्वीन (Deccan Queen) येत्या 26 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडल्याने प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी अन् सुखकारक होणार आहे. व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (Integral Coach Factory) तयार केले गेले आहेत.

Web Title :-  panchavati express and jan shatabdi express for mumbai nashik travel will start soon

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास