शहीद मेजर अनुज सूद यांचा 4 महिन्यांपुर्वी झाला होता विवाह, पत्नीशी WhatsApp वर अखेरचे बोलले

पोलिसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरात भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये मेजर, कर्नल, पोलीस अधिकार्‍यासह तीन जवान शहीद झाले आहेत. कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, दिनेश शर्मा, जम्मू-काश्मीरचे पोलीस निरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे. या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद याच्या शहीद झाल्याची बातमी कुटुंबाला कळताच, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. चार महिन्यांपुर्वी त्यांचा विवाह झाला होता.

ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) सीके सूद यांनी सांगितले की, शहीद झालेल्या या मुलाचा मला अभिमान आहे. तीन दिवस म्हणजे 1 मेपासून ऑपरेशनवर होता. आमचे शेवटचे संभाषण व्हॉट्सअ‍ॅपवर झाले होते. तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो. तो नेहमीच धाडसी होता आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सर्वात पुढे होता. त्याच्याबरोबर शहीद झालेले सर्व जवान खूप शूर होते. अशा शूर सैनिकांना भारतरत्न नाही पण किमान त्यांना अशोक चक्र मिळायला हवे. जेव्हा आपण कोरोना योद्धांविषयी बोलत आहोत, तेव्हा असे खरे योद्धा आपल्या छातीत बुलेट घेत आहेत. हंदवाडा इथल्या चांजमुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना घरात बंदी बनवले होते. एका घरात त्यांना ठेवल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी टीम रवाना झाली. याच दरम्यान त्यांच्यात चकमक झाली. त्यामध्ये मुलगा शहीर झाला. त्याचा चार महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. त्याची आई आणि पत्नीला अजूनही अनूज शहीद झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.