जोडीदाराला क्रूर सिद्ध करण्यासाठी ‘कॉल रेकॉर्ड’ करणं हे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन: उच्च न्यायालय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पत्नीला क्रूर सिद्ध करण्यासाठी पत्नीचा फोन कॉल रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, ज्यास कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहित केले जाऊ नये. मुलाला ताब्यात घेण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना पंचकुला येथील रहिवासी महिलेने सांगितले की तिचे पतीशी वैवाहिक वाद सुरू आहे.

वादाच्या वेळी पती आपल्या चार वर्षांच्या मुलीस घेऊन गेला होता. याचिकाकर्ता महिलेने म्हटले आहे की असे करणे थेट तिच्या मुलीला बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यासारखे आहे. त्यांनी सांगितले की मुलगी कोणासोबत राहील या संदर्भात कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण विचाराधीन आहे. याचिकाकर्ता महिलेने सुनावणीदरम्यान सांगितले की, तिचा पती तिला क्रूर दाखविण्यासाठी फोन कॉल रेकॉर्ड करतो आणि तो पुरावा म्हणून सादर करतो.

एखादी व्यक्ती एखाद्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन कशी करू शकते यावर हायकोर्टाने आश्चर्य व्यक्त केले. जोडीदारासोबत फोनवर केलेल्या संभाषणाला जोडीदाराच्या संमतीशिवाय रेकॉर्ड करणे ही गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी बाब आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने हा पुरावा सादर करणाऱ्या पतीला जोरदार फटकारले.

कोठडीचा निर्णय येईपर्यंत मुलगी आईजवळ राहील: उच्च न्यायालय

यासह उच्च न्यायालयाने सांगितले की मुलगी पाच वर्षाखालील आहे, म्हणून तिच्या कोठडीबाबत कौटुंबिक कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तिला तिच्या आईकडे ठेवावे. या टिप्पणीसह उच्च न्यायालयाने महिलेची याचिका निकाली काढली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like