मुंबईतील ‘कोरोना’ची इतिहासात होणार नोंद, ‘ही’ माहिती जपून ठेवली जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबईत 18 व्या शतकात आलेल्या प्लेगच्या साथीनंतर सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या साथीचा दस्तावेज तयार होणार आहे. यातून भविष्यात अशा प्रकराची साथ आल्यास कशा प्रकारे प्रतिबंध करावा याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय पथकाने शुक्रवारी वांद्रे येथील खेरवाडी प्रतिबंधित क्षेत्रासह काही जंम्बो कोविड केंद्राची पाहणी केली.

पाहणीनंतर झालेल्या बैठकीत या पथकाने महापालिकेने आतापर्य़ंत केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे डॉक्युमेंटेशन तयार करण्याची सूचना केली आहे. यात रुग्णालय उभारणीसाठी प्रतिबंधासाठी केलेल्या सर्व उपायांची नोंद करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून भविष्यात कधी अशा प्रकारची साथ आल्यास त्या नोंदीची मदत घेता येईल.

महापालिकेने एक हजार खाटांची काही कोविड केंद्रे उभारली आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीची हायरिस्क लो रिस्क वर्गवारी करणे, विलगीकरण कक्ष तयार करणे असे उपाय केले आहेत. तसेच निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन या सर्व बाबींची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. केंद्रीय पथकाने पालिकेने केलेल्या प्रतिबंधात्मक उपयांचे डॉक्युमेंटशन करण्याची शिफारस केली आहे, असे पालिकेच्या उप आरोग्य अधिकारी दक्षा शहा यांनी सांगितले.

1896 च्या सप्टेंबर महिन्यात प्लेगच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. ही साथ हळूहळू देशभरात पसरली. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तयार करण्यात आला होता. कोरोनाच्या साथ नियंत्रणासाठीही हाच कायदा सध्या देशभरात लागू आहे. प्लेगनंतर कोविडच्या साथीसाठी पहिल्यांदाच हा कायदा एकाच वेळी संपुर्ण देशात लागू केला आहे. यात कायद्याच्या आधारावर प्रशासनाला विशेष अधिकार प्राप्त होतात. या साथीची नोंद अनेक वैद्यकिय जर्नलमध्ये झाली आहे. तसेच काही संशोधनात्मक पुस्तकेही प्रकाशीत झाली आहेत. त्याच धर्तीवर आता मुंबईतील कोरोनाचीही इतिहासात नोंद होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like