पंढरपुरात भाजपची जोरदार मुसंडी; 25 फेरी अखेरीस आवताडे आघाडीवर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत 25 फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी तब्बल 6200 मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसले आहे. निवडणुकीत भालके विजयी होणार की आवताडे बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण आता आवताडेंनी तब्बल 6200 मतांनी आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीपासून आवताडे आघाडीवर आहेत. यापूर्वी दुसऱ्या फेरीअखेरीस आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492 मते मिळाली आहेत. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भालकेंना 8613 मते मिळाली आहेत. तर समाधान आवताडे यांना 7978 मते मिळाली आहेत. पण, त्यानंतर डाव पलटला. 7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

आतापर्यंतचा मतमोजणीच्या फे-या

– पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे 450 मतांनी आघाडीवर

– दुसऱ्या फेरीअखेर आवताडे आणि भालके यांना समसमान म्हणजेच 114 मते मिळाली होती.

– तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भालके पुढे

– चौथ्या फेरीअखेर आवताडे 11303, भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर

– 5 व्या फेरीअखेर भालके 521मतांनी आघाडीवर.

– 7 व्या फेरी अखेर आवताडे 100 मतांनी आघाडीवर.

– 8 व्या फेरी अखेर आवताडे 2295 मतांनी आघाडीवर

– 11 व्या फेरी अखेर आवताडे 1503 मतांनी आघाडीवर.

– 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409 मतांनी आघाडीवर

– 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर

– 17 व्या फेरी अखेर 901 मतांनी आवताडे आघाडीवर

– 18 व्या फेरी अखेर आवताडे 1209 मतांनी आघाडीवर

– 19 व्या फेरी अखेर आवताडे 1022 मतांनी आघाडीवर

– 21 व्या फेरी अखेर आवताडे 3486 मतांनी आघाडीवर

– 22 व्या फेरी आवताडे 3908 मतांनी आघाडीवर

– 23 व्या फेरी अखेर आवताडे 5807 मतांनी आघाडीवर

– 25 व्या फेरी अखेर आवताडे 6200 मतांनी आघाडीवर आहेत.