पंढरपूर, बार्शी तालुका पोलिस ठाणे आजपासून नागरिकांच्या सेवेत

पंढरपूरः पोलीसनामा आॅनलाईन

तालुक्यातील दिवसेदिवस वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहता गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस खात्याने 24 गावांसाठी स्वतत्र ग्रामिण पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. याचे आज मंगळवार ( दिनांक-1मे) रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता उद्धाटन होणार आहे.

यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष मानगावे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. यापूर्वी तालुक्यातील ११० गावे व वाड्यावस्त्यांसाठी पंढरपूर तालुका पोलिस ठाणे, करकंब पोलिस ठाणे व वेगवेगळे बीट होते. मात्र आता २४ गावांसाठी आणखी एक स्वतंत्र ग्रामीण पोलिस ठाणे सुरू होत आहे. येथील उजनीच्या सांस्कृतिक भवनाजवळ हे पोलिस ठाणे सुरू होणार असून यासाठी चार सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ५४ पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत.

नवीन पोलीस ठाण्यात या गावांचा असणार समावेशः

वाखरी, उपरी, पळशी, सुपली, जैनवाडी, धोंडेवाडी, भाळवणी, केसकरवाडी, वाडीकुरोली, खेडभाळवणी, शेळवे, पिराचीकुरोली, भंडीशेगाव, कौठाळी, शिरढोण, गादेगाव, गार्डी, शेंडगेवाडी, लोणारवाडी, कोर्टी, बोहाळी, उंबरगाव, सोनके, तिसंगी.
बार्शी, वैराग, पांगरीकडील ५९ गावांचा समावेश