Homeक्राईम स्टोरीफॉर्च्युनर गाडी पलटून भीषण अपघात, प्रसिध्द उद्योजक सागर दोषींचा जागीच मृत्यू

फॉर्च्युनर गाडी पलटून भीषण अपघात, प्रसिध्द उद्योजक सागर दोषींचा जागीच मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरपूर- मोहोळ रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पंढरपूरमधील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोषी यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सागर दोषी यांचा मृत्यू झाला आहे. गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी पलटली आणि या भीषण अपघाता त्यांचा मृत्यू झाला. गाडीतील अन्य ४ व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सागर दोषी आणि मित्र परिवार कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परतीच्या प्रवासात उशीर झाल्याने ते पंढरपूर- मोहोळ रोडवरील साईराज हॉटेल येथे जेवण्यासाठी थांबले होते. जेवणानंतर परतताना फॉर्च्युनर गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी ४ पलट्या घेऊन आदळली. सागर दोषी यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा पंढरपुर शहरात चांगला संर्पक होता. पंढरपूर येथील महालक्ष्मी मसालेचे मालक अशोक दोषी यांचे सुपुत्र सागर दोषी यांनी नुकतीच महालक्ष्मी फर्निचरच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली होती.

मित्र परिवाराबरोबर सागर यांनी लेह -लडाख आणि कन्याकुमारीपर्यंत बाईकवर प्रवास केला होता. काही वर्षातच सागर दोषी यांनी यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली असतानाच अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सागर दोषी यांना रायडिंगचा छंद होता. त्यांच्या अपघातामुळे कुटुंबात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News