पंढरपूर : अजित पवारांच्या ‘या’ गोष्टीमुळे भाजपची हवा टाईट

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु असून, प्रचार आणि बैठकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिक जोर धरल्याचे दिसते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या मतदारसंघात अनेक सभा घेत आहेत. तर काल अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये दिवसभर सभा घेतल्या त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांनी अनेक भागात सर्व लोंकासोबत सवांद सुद्धा साधला आहे.

या मतदारसंघात अधिकतर भाजपचं वर्चस्व असताना सुद्धा अजित पवार यांनी तेथील मतदारसंघातील लोकांशी सवांद साधला. तर धनगर समाजाचे अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सवांद साधत राष्ट्रवादी पक्ष तुमच्या मागे उभा आहे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. तर ही निवडणूक महत्वाची आणि अधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यावेळी पवार हे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना घेऊन प्रथमच धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मनसेच राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कार्यकर्त्यांशी पवार यांनी सवांद साधला. असा सभेचा आणि भेटीचा पवार यांनी धडाका लावला.

पंढरपूरच्या भाजपच्या परिचारक गटाच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांची देखील अजित पवार यांनी भेट घेतल्याने भाजपात चर्चेला उधाण आलं आहे. तर साधना भोसले ह्या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे पती आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी यावेळी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने ते नाराज होते. याचाच फायदा घेत पवार यांनी साधना भोसले यांची भेट घेतल्याने तर्कवितर्क चर्चा सुरू आहे.

या दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार यांनी सभेचा धडाका लावला आहे. तर रात्रीच्या या भेटीमुळे भाजपा समोर संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. मात्र भाजपचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी अजून प्रचारामध्ये भाग घेतला नाही. तसेच अजित पवार हे (९ एप्रिल) आजही मंगळवेढा येथे प्रचाराचा धडाका लावणार असल्याने भाजप पक्षाची चिंता वाढताना दिसत आहे.