Pandharpur Crime News | धक्कादायक ! मटणाचे जेवण दिले नाही म्हणून केले गळ्यावर वार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – तीन मित्रांची पार्टी (Party) सुरु असताना अचानक आलेल्या इतर दोघांना मटणाचे (Mutton) जेवण दिले नाही. यामुळे चिडलेल्या दोघांनी बेदम मारहाण करत गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) पंढरपूर (Pandharpur Crime News) येथे घडली आहे. ही घटना पंढरपूर शहरातील (Pandharpur City) स्मशानभूमी शेजारी असलेल्या एका हॉलमध्ये शुक्रवारी (दि.25) दुपारी चारच्या सुमारास घडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान सुरेश गायकवाड Samadhan Suresh Gaikwad (वय-29 रा. संतपेठ, महात्माफुले चौक, पंढरपूर) आणि त्याचे दोन मित्र भरत आणि बाळा हे तिघेजण स्मशानभूमिजवळ असलेल्या हॉलमध्ये मटणाची पार्टी (Mutton party) करत होते. दरम्यान त्या ठिकाणी दादा कदम (Dada Kadam) आणि किशोर दिलीप बंदपट्टे (Kishor Dilip Bandpatte) (दोघे रा. पंढरपूर) हे दोघे आले. आम्हाला जेवण द्या असे म्हणून त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

दोघांना पोलीस कोठडी (police custody)
मारहाणी दरम्यान आरोपी दादा कदम याने समाधान गायकवाड याच्या गळ्यावर (Neck) व मानेवर चाकूने (Knife) वार केले. तर किशोर बंदपट्टे याने लाकडाने बेदम मारहाण केली. या प्रकरणामध्ये पंढरपूर पोलिसांनी (Pandharpur Police Station) दादा कदम आणि किशोर बंदपट्टे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Titel :- pandharpur crime news | shocking mutton meal was not given blow neck incident pandharpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर