Pandharpur Crime | पंढरपूर हादरलं ! 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, 3 आरोपींना इंदापूरमधून अटक

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात दिवाळीची धूमधाम सुरु असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) पंढरपूरमध्ये (Pandharpur Crime) धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur Crime) एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसानी तीन जणांना अटक (Arrest) केली आहे.

 

मुख्य आरोपी युवराज प्रकाश गोडसे, रणजीत दत्तात्रेय कोळेकर (वय-23 दोघे रा. उघडेवाडी) आणि रोहन दत्तात्रय भोसले (वय-19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिन्ही आरोपींना पोलिसांनी आज पंढरपूर न्यायालयात (Pandharpur court) हजर केले असता त्यांना 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना माळशीरस तालुक्यातील उघडेवाडी (Ughadewadi taluka Malshiras ) येथे घडली आहे.
पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात असताना तीन नराधमांनी तिला अडवून तिची छेड (Pandharpur Crime) काढली.
त्यानंतर तिला बाजूला असलेल्या आडोशाला नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

 

पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात (Velapur police station) धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तीन जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा (Pandharpur Crime) शोध घेऊन सुरु केला.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी इंदापूरमध्ये (Indapur) असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सापळा रचून आरोपींना इंदापूरमधून अटक केली.

 

Web Title : Pandharpur Crime | Pandharpur trembled! 13-year-old girl gang-raped, 3 accused arrested from Indapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sabyasachi Mukherjee | अखेर सब्यसाची मुखर्जीने ‘ती’ जाहिरात घेतली माघार

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर