पंढरपूर : 1 ली तील विद्यार्थ्यावर ‘अश्‍लील’तेचा ठपका, संस्थाचालकाविरूध्द FIR

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षिकेशी अश्लील आणि लाजिरवाणे वर्तन केल्याचा ठपका पहिली इयत्तेतील मुलावर ठेवण्यात आला होता. संस्था चालकांनी या प्रकरणी या मुलाला शाळेतून काढून टाकले होते. या प्रकरणी अखेर संस्थाचालक नागेश माळवे यांच्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी बाल हक्क संरक्षण अधिनियम 2015 कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या व्यवस्थापनाने पहिलीत शिकणाऱ्या मुलाला शाळेतून काढून टाकले होते. त्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर खेर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक द्यानंद गावडे यांनी या संस्था चालकावर काल रात्री गुन्हा दाखल केला आहे.

या मुलाला शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेत मोफत प्रवेश मिळाला होता. या मुलाचे पालक चहा टपरी चालवतात. या पीडित मुलाला दिलेल्या नोटिशीतील मजकूरामुळे मुलाच्या शैक्षणिक व मानसिक जडणघडणीवर परिणाम होईल या कारणाने व्यवस्थापनावर कलक 75 जे जे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हानुसार 5 वर्षांची शिक्षा किंवा पाच लाखाचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. 

 

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like