हिंदू संमेलनात नथुराम गोडसे ‘अमर रहे’ च्या घोषणा ! देवेंद्र फडणवीसांवर देखील टीकास्त्र

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय हिंदू महासभेचे ‘जागो हिंदू संमेलन’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या हिंदू संमेलनात अनेक कट्टर संघटना आणि नेते सहभागी झाले होते. या संमेलनात महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करण्यात आला. त्यामुळे वाद चांगलाच उफाळून आला आहे. मिलिंद एकबोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. हिंदू संतांना त्यांनी मदत केली नाही म्हणून त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले अशी टीका एकबोटेंकडून करण्यात आली. संमेलनात अनेकांनी नथुराम कसा देशभक्त होता यावर भाष्य केले. तर अनेकांनी नथुराम गोडसे अमर रहे अशाही घोषणा दिल्या.

याआधी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी संसदेत नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचे सांगितले. त्यानंतर झालेल्या वादामुळे त्यांनी लोकसभेत माफीही मागितली. भाजपने देखील त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला. त्यानंतर संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

एकबोटेंची वादग्रस्त विधाने
एकबोटे म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचे थडगे आहे. ते थडगे काढण्याऐवजी त्याला जागा मिळत आहे. मात्र समाज उपयोगी कामं करत असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम पाडण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

पंढरपूरात झालेल्या या संमेलनात गोरक्षण, हिंदुत्वावर आघात, तीर्थक्षेत्राचं पावित्र्य, बालयोगी सदानंद महाराज आश्रम बचाव या विषयांवर चर्चा झाली. यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक उपस्थित होते. कत्तलखान्यातील पैसे दहशतवादासाठी जातात. त्यामुळे कत्तलखाने बंद केले पाहिजेत असे ते म्हणाले.

Visit : policenama.com